‘घोडबंदर रोडवरील ट्रॅफीक कोंडीचे काहीतरी करा’; मुख्यमंत्री शिंदेना ट्रॅफीक समस्या सोडविण्यासाठी नागरिकांची विनंती

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

घोडबंदर रोड हा तर जवळपास दररोजच वाहतूक कोंडीचा शिकार झालेला असतो. नेहमीची वाहतूक कोंडी आता नागरिकांच्या संतापाचा विषय ठरत आहे. परिणामी नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच मदतीची मागणी केली आहे. अनेकांनी मुख्यमंत्र्यांकडे या वाहतुकीचे काहीतरी करा, जेणेकरुन लोकांना मोकळा श्वास आणि सुखकर प्रवास करता येऊ शकेल, अशी मागणी केली आहे. पाटीलपाडा येथील पुलाजवळ रसायनांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानंतर उद्भवलेली कोंडी फोडल्याला एकच दिवस उलटला. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी पुन्हा तीच परिस्थीती निर्माण झाल्याने नागरिकांच्या संतापाला पारावार राहिला नाही.

नागरिकांचा संताप, कर्मचाऱ्यांचे हाल
ठाणे-बोरिवली रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे ठाण्याकडून मुंबईमध्ये येणाऱ्या प्रवासी आणि चाकरमान्यांना दररोज अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना मनस्ताप आणि नोकरदार वर्गास कार्यालयात जाण्यास उशीर होत आहे. हे नागरिक जड वाहनांवर निर्बंध घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विनंती करत आहेत. घोडबंदर रोड वापरुन कार्यालयात जाणारे अनेक लोक बस, रिक्षा सोडून मध्येच प्रवास थांबवत आहेत आणि पर्यायी मार्ग शोधत आहेत. काहींनी तर चालत निघाले असून ते पायीच कार्यालय जवळ करु पाहात आहेत. काहींनी ‘वर्क फ्रॉम होम’ पर्याय निवडत घरुनच काम सुरु केले आहे.

ट्रॅफीकमध्ये बस अडकल्या, थांब्यांवर प्रवाशांची गर्दी
अनेक बस रस्त्यावरच ट्रॅफीकमध्ये अडकल्या आहेत. त्यामुळे बसमधील प्रवाशांचा खोळंबा झालाच आहे. दुसऱ्या बाजूला बस न आल्याने बस थांब्यांवरही तेवढीच गर्दी वढली आहे. अनेक लोक बसची वाट बघून कंटाळले आहेत. कामचा खोळंबा झाल्याने मनस्ताप सहन करत प्रशासनाला शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे. या वाहतूक कोंडीमुळे हिरानंदानी आणि ब्रह्मांड ते ठाणे या टीएमटी बससेवेवरही परिणाम होत आहे. टीएमटीच्या अनेक बस आधीच ट्रॅफिकमध्ये अडकल्या आहेत, त्यामुळे ठाणे स्थानकापर्यंत मोजक्याच सेवा सुरू आहेत. आर-मॉल बसस्थानकावर लोक टीएमटी बसची वाट पाहत आहेत.

ट्रॅफीकमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या पोस्ट्स :

 

 

 

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *