राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

Spread the love

प्रतिनिधी :दर्पण गांवकर  Updated on: Nov 08, 2023 |

मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्रातील शिंदे सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांना महागाई भत्ता ४२ टक्के झाला होता. पण, आता शिंदे सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेण्याची तयारी केल्याचं दिसतंय. त्यामुळे त्यांच्या महागाई भत्त्यात आणखी चार टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. यामुळे त्यांचा महागाई भत्ता आता ४६ टक्के होईल.

साधारणपणे वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात येत असतो. याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जून महिन्यामध्ये वाढवला होता. केंद्र सरकारने देखील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना ४६ टक्के महागाई भत्ता मिळतो. त्यांच्या महागाई भत्त्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *