मिरा – भाईंदर मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात संपन्न

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

भाईंदर (प्रतिनिधी) : सम्राट अशोकाने कलिंगचे युद्ध जिंकल्यानंतर दहा दिवस विजय उत्सव साजरा केला आणि दहाव्या दिवशी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ही साजरा केला जातो.

बौद्ध धर्माचा स्वीकार करून सम्राट अशोकाने हिंसेचा आणि शस्त्रांचा त्याग केला आणि बौद्ध धर्माचा प्रसार भारतात आणि भारताबाहेर ही केला.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांच्या सोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन
आधुनिक भारताला बौद्ध धर्माची नव्याने ओळख करून देण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असे प्रतिपादन प्रा. डॉ. गौतम टेंकाळे यांनी केले. धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. प्रा. उत्तम भगत यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमात विलास जाधव यांनी प्रास्ताविक केले. महानंद बडगे यांनी धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार निर्मितीचा इतिहास सांगून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर चंद्रमणी मनवर, अनिल भगत, सुनिल जाधव, देवेंद्र शेलेकर , सुनिल कांबळे, धिरज परब, बाबुराव शिंदे यांनीही शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मा. आ. नरेंद्र मेहता, मा. आ. मुजफ्फर हुसैन, आ. गीता जैन, प्रमोद सामंत, नीला सोन्स यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मिरा भाईंदर मधील भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, मिरा भाईंदर बुद्धिस्ट पीपल्स फाऊंडेशन, एक विचार एक मंच, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान, धम्म के पथ पर महिला समूह, डॉ . आंबेडकर विचारमंच , प्रबुद्ध विचार मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसियेशन, सम्यक विचार सामाजिक संस्था, आदर्श सेवा सेवाभावी संस्था, दलित पँथर आदी संस्था प्रतिनिधीसह प्रा. भास्कर पैठणकर, संतोष जाधव, दिलीप लोंढे, श्याम शहारे, सरोजिनी बडगे, अरुण दाभाडे , अर्जुन तायडे, सिद्धार्थ नगरकर, त्रिशला ढोले, विद्याताई थोटे, सलीम खान , विश्वनाथ तायडे, अश्विनी कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन बंडे यांनी तर आभार प्रदर्शन दिलीप सुरडकर यांनी केले. यावेळी सुनिल कंठे, कृतीका शहारे व धम्म के पथ पर महिला समूह, स्वाती भिसे, डॉ. कल्याणी फुलझेले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

इंद्रलोक येथील प्रफुल्ल पाटील चौक येथून रथात स्थापित बुद्धमूर्तीची व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. धम्मबांधवांनी उचलून धरलेला पन्नास फुट लांबीचा पंचशील ध्वज आकर्षणाचे केंद्र बनला होता. बुद्धम् शरणं गच्छामी, धम्मम् शरणं गच्छामी, संघम् शरणं गच्छामीच्या सुरात धम्म रॅली धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार येथे पोहोचली. त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी सतीश जाधव दिग्दर्शित सिग्मा म्युझिकल इव्हेंटस् यांनी सादर केलेल्या बुद्ध भीम प्रबोधन गीतांचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमाला मिरा भाईंदर परिसरातील धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व्यवस्थापन समितीचे प्रा. सुनिल धापसे, पवनकुमार शिंदे, तिलोत्तमा वाळके, नरेश मोहिते, नारायण थोटे आदींनी परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *