सातारा : दहिवडी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन
माण : तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक,सेवेत असणारे शिक्षक व प्रमुख कार्यकर्त्यांचीव धम्म बाधवांची बैठक दहिवडी येथील रेस्ट हाउस वर पार पडली त्यामध्ये 24 आक्टोबर रोजी दहिवडी, ता. माण या ठिकाणी धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्याचे ठरविण्यात आले
यावेळी सदर बैठकीमध्ये कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली 24 ऑक्टोबर रोजी दहिवडी येथील बुद्ध विहारात सकाळी 11 वाजतां ध्वजारोहन होऊन बुद्ध वंदनेने सुरुवात झाल्यानंतर धम्म ध्वज रॅली निघणार असून बुद्ध विहारापासुन रॅलीला सुरुवात होऊन रॅली नियोजित कार्यक्रम स्थळी (सिद्धनाथ मंगल कार्यालय )
येथे पोहोचणार आहे.
धम्मचक्र प्रवर्तन कार्यक्रमाचे अध्यक्ष जत तालुक्याचे तहसीलदार मा.जीवन बनसोडे भूषविणार आहेत प्रमुख वक्ते म्हणून भारतीय बौध्द महासंभा शाखा सातारा जिल्हाध्यक्ष आयु. श्रीमंत घोरपडे सर, आयु.डॉ. सुधीर वाघमारे, माजी सभापती आयु. बाळासाहेब रणपिसे असणार असून सदर कार्यक्रमास येणाऱ्या समाज बांधवासाठी आयु.जीवन बनसोडे तहसीलदार साहेब याचेकडून भोजनदान दिले जाणार आहे.
दुपारी 11 ते 12 यावेळेत माण तालुक्यातील हिंगणी गावातील प्रसिद्ध सिद्धार्थ गायन पार्टी यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम होनार आहे.
या कार्यक्रमास माण तालुक्यातील धम्म बांधवानी मोठ्या संख्येने आपल्या परिवारासह उपस्थित राहून कार्यक्रम शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात येत आहे.
यावेळी माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, युवराज भोसले, वाघमारे सर,ऍड बाळासाहेब सांवत, बौध्दचार्य अमर खरात, रणपिसे गुरुजी,राजू तोरणे सर, पत्रकार अतुल खरात,व इतर धम्म बांधव उपस्थित होते…