काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापलं आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या एका विधानामुळे महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. यासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय अपडेट्स, पाऊस-पाण्याच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश राहा.
“औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन देवेंद्र फडणवीस”, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल
“औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन कोण आहेत? ते काल आम्ही पाहिलं. औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन देवेंद्र फडणवीस आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे लोकही त्या क्लबे सदस्य आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी महाविकास आघाडीने आंदोलन केलं. मात्र, आमचं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.