डेंग्यू्चा धोका होणार कमी, भारताने विकसित केली डेंग्यूची लस

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

डेंग्यू्च्या आजाराने अनेक जणांचे मृत्यू होत असतात. डेंग्यूमध्ये रक्तातील प्लेटलेट कमी होत असल्याने रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका होत असतो. प्लेट वाढण्यासाठी अनेक घरगुती उपायांसोबत अनेकांना तर रक्तातील प्लेटलेट चढविण्याची वेळ येते. आता डेंग्यू बाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च सेंटरने दिलासा दायक बातमी दिली आहे. भारताने डेंग्यूची लस विकसित केली असून तिच्या अंतिम ट्रायलवर काम चालू आहे.

डेंग्यूची व्हॅक्सीन भारतात तयार
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संचालक डॉ. राजीव बहल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की भारताने डेंग्यूची लस तयार केली आहे.याचे तंत्रज्ञान अमेरिकेच्या एनआयएच यांनी तयार केले आहे. परंतू ते या लसीच्या निर्मितीपर्यंत पोहचले नव्हते. परंतू आता भारताने ही लसी संपूर्णपणे तयार करण्यात यश मिळविले आहे.

डेंग्यू साठी बनविलेल्या लसीला आयसीएमआरने पाठींबा दिला आहे. ड्रग कंट्रोल जनरलनी फेस-3 च्या अंतिम ट्रायलला मंजूरी दिली आहे. पुढील दोन वर्षांनंतर याचा रिझल्ट येणार आहे. त्याचे रिझल्ट पॉझिटीव्ह आले तर आपल्याला व्हॅक्सीनचा वापर संपूर्णपणे करता येणार आहे. ही डेंग्यूवर देशात तयार होणारी पहीली लस होणार आहे. ही व्हॅक्सीन डेंग्यूसाठी फायदेशीर ठरणार आहे. गेली 81 वर्षे डेंग्यूवर लस संशोधन करता आली नव्हती.

आणखी एका व्हॅक्सीनवर काम सुरु
अशाच प्रकारे आणखी एका व्हॅक्सीनवर काम सुरु आहे, जी ज्युनोटिक आजारासाठी तयार करण्यात येणार आहे. या व्हॅक्सिनला भारतात तयार करण्यात आले आहे. आयसीएमआर यांच्या सहकार्याने या दोन्ही लसी तयार होत आहेत. या लसीचे लहान प्राण्यांवर केलेल्या चाचण्यांना यश आले आहे. नंतर मोठे प्राणी आणि मानवावर चाचणी केली जाणार आहे. पहिल्या चाचणीला मंजूरी देखील मिळाल्याचे इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संचालक डॉ. राजीव बहल यांनी म्हटले आहे.

मंकी पॉक्स डायग्नोस्टीक टेस्ट
भारतात एमपॉक्स आजाराचे ( मंकी पॉक्स ) निदान चाचणी कीट देखील विकसित करण्यात यश आलेले आहे. त्यामुळे या आजाराचे निदान करणे आता भारतात शक्य होणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *