दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. चाणक्यपुरी भागात इमारतीवरून उडी मारून आयएफएस अधिकारी जितेंद्र रावत यांनी आत्महत्या (IFS officer Jitendra Rawat Suicide) केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरून पोलिसांना अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. सध्या पोलिस या प्रकरणातील इतर पैलूंचा तपास करत आहेत. सध्या समोर येत असलेल्या सुरुवातीच्या माहितीनुसार, जितेंद्र रावत नैराश्याने ग्रस्त होते. जितेंद्र रावत हे उत्तराखंडचे रहिवासी होते. त्याचे वय सुमारे 40 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे.
इमारतीच्या छतावरून उडी मारून केली आत्महत्या –
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी 6 वाजता घडली. चाणक्यपुरी येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या निवासी सोसायटीच्या इमारतीच्या छतावरून उडी मारून आयएफएस जितेंद्र रावत यांनी आत्महत्या केली. रावत हे एमईएच्या निवासी सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर राहत होते. घटनेच्या वेळी घरी फक्त त्याची आई होती. अधिकारी विवाहित आहे, त्याची पत्नी आणि दोन मुले डेहराडूनमध्ये राहतात. रावत गे गेल्या काही दिवसांपासून नैराश्याने ग्रस्त होते. तसेच त्याच्यावर उपचार सुरू असल्याचंही सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. त्या अधिकाऱ्याने आत्महत्या का केली हे पोलिसांना अद्याप कळू शकलेले नाही. अधिकाऱ्याच्या मृत्यूचे खरे कारण तपासानंतरच कळेल, असे पोलिसांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएफएस अधिकाऱ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.