लेखणी बुलंद टीम:
नेपाळमध्ये रविवारी पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या 122 वर पोहोचली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. पूर्व आणि मध्य नेपाळचा मोठा भाग शुक्रवारपासून पाण्याखाली गेला आहे. देशाच्या अनेक भागात अचानक पूर आला आहे.
पोलीस दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर आणि भूस्खलनामुळे 64 लोक बेपत्ता आहेत. तर 45 जण जखमी झाले आहेत. काठमांडू खोऱ्यात सर्वाधिक 48 लोकांचा मृत्यू झाला आहे. किमान195 घरे आणि आठ पुलांचे नुकसान झाले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुमारे 3,100 जणांची सुटका केली आहे.
सशस्त्र पोलिस दलाने सांगितले की मृतांची संख्या 122 वर पोहोचली आहे. काठमांडूजवळील धाडिंग जिल्ह्यात शनिवारी बस दरड कोसळून झालेल्या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला. भक्तपूर शहरात दरड कोसळून घर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला.