ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट स्टार डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी क्रिकेटऐवजी तो सिनेविश्वात चर्चेचा विषय बनला आहे. वॉर्नर अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार असल्याच्या बातम्या आहेत. या अफवेने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे, येथे जाणून घ्या, अधिक माहिती
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट स्टार डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी क्रिकेटऐवजी तो सिनेविश्वात चर्चेचा विषय बनला आहे. वॉर्नर अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार असल्याच्या बातम्या आहेत. या अफवेने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे, विशेषत: काही लीक झालेल्या छायाचित्रांमध्ये वॉर्नरला सोनेरी हँडगन घेतलेल्या स्टायलिश गँगस्टर अवतारात दिसल्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगली आहे. वॉर्नरचे भारतीय चित्रपट, विशेषत: तेलुगु चित्रपटांबद्दलचे प्रेम, त्याच्या TikToks आणि Reels मधून दिसून येते, TikToks वर त्याने दक्षिण भारतीय ब्लॉकबस्टर्समधील प्रतिष्ठित व्हिडीओ आणि नृत्य व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे देखील वाचा: अभिनेत्री Parvati Nair हीच्यावर मारहाणीचा आरोप, न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल
TikTok वर टाकलेल्या व्हिडीओमुळे महामारीच्या काळात डेव्हिड वॉर्नरला भारतात खूप मोठा चाहतावर्ग मिळाला. मला ‘पुष्पा 2’ मध्ये अभिनय करायचा आहे, असे त्याने एकदा गमतीने सांगितले होते.
डेव्हिड वॉर्नरचा डॉन अवतार:
🚨 DAVID WARNER SPOTTED IN A FILM SHOOT IN MELBOURNE!
As per reports, he’s set to take on the thrilling role of a DON in an Indian movie, most probably PUSHPA 2. 👀
CRAZYYY CROSSOVER! 💥 pic.twitter.com/H6AfsaDhnw
— Sports Production (@SportsProd37) September 20, 2024