पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ‘यूआर खिस्तियानो’ या यू-ट्यूब चॅनेलला सुरू होताच 90 मिनिटांत 10 लाख आणि एका दिवसात एक कोटी लोकांनी सब्सक्राइब केले. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या यू-ट्यूब चॅनलला 22 मिनिटात सिल्व्हर बटण, 90 मिनिटात गोल्डन बटण आणि अवघ्या 12 तासात डायमंड यूट्यूबचे डायमंड बटण मिळाले.
ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या या चॅनेलवर 12 व्हिडिओ पोस्ट केले आहेत. रोनाल्डोच्या 12 व्हिडिओंना 50 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. थिंकऑफ रिपोर्टनुसार, यू- ट्यूबला एक मिलियन व्ह्यूजसाठी सहा हजार डॉलर मिळतात. त्यानुसार रोनाल्डोने एका दिवसात किमान तीन लाख डॉलरची कमाई केली आहे.
रोनाल्डो सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू मानला जातो. रोनाल्डोचे एक्स (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर 112.5 दशलक्ष फॉलोअर्स, फेसबुकवर 170 मिलियन फॉलोअर्स आणि इंस्टाग्रामवर 636 मिलियन फॉलोअर्स आहेत. रोनाल्डोची एकूण संपत्ती किमान 800 मिलियन डॉलर ते 950 मिलियन डॉलरच्या दरम्यान आहे.