जोडप्याची हत्या करून घरातच जाळले त्यांचे मृतदेह

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

बिहारमधील नालंदा येथे पती-पत्नीची घरातच हत्या करून मृतदेह जाळण्यात आले. हे प्रकरण छबिलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोगी गावातले आहे. 54 वर्षीय विजय प्रसाद आणि त्यांची 50 वर्षीय पत्नी कांती देवी अशी मृतांची नावे असून ते डोगी गावचे रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या घटनेबाबत मृताचा मुलाने सांगितले की, सोमवारी सकाळी तो त्याच्या घरातून दुसऱ्या घरी गेला, जिथे त्याचे आई-वडील राहत होते. तेथे दरवाजा उघडा होता आणि नाल्यातून रक्त वाहत होते. आत गेल्यावर आई-वडील जळत असल्याचे दिसले. त्यानंतर त्याने सर्व भावांना बोलावले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह जळत असलेल्या खोलीत रक्ताचे लोट पसरले होते. त्यामुळे प्रथम कोणीतरी खून केला आणि मृतदेह जाळून अपघाताचे भासवण्याचा प्रयत्न केला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी छबिलापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास करीत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *