नवीन वर्षात सिगारेट, तंबाखू, कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्यास लागू शकते खिशाला कात्री

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

नवीन वर्षात सिगारेट, तंबाखू, कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्यास खिशाला कात्री लागू शकते. जीएसटी दर ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने या उत्पादनांवरील जीएसटी दर सध्याच्या २८ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. 21 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथे GST परिषदेची 55 वी बैठक होणार आहे, ज्यामध्ये सिगारेट, तंबाखू आणि कोल्ड्रिंक्सवरील GST दर वाढविण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. दर तर्कसंगत करण्यासाठी जीएसटी परिषदेने बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची स्थापना केली होती. परस्पर संमतीनंतर, मंत्री गटाने सिगारेट, तंबाखू आणि संबंधित उत्पादनांवरील जीएसटी दर 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, जो सध्या 28 टक्के आहे.

जीएसटी परिषद अंतिम निर्णय घेईल

21 डिसेंबर रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या GST परिषदेच्या बैठकीत मंत्री गटाच्या शिफारशींवर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर परिषद त्यावर अंतिम निर्णय घेईल. सध्या जीएसटी दरांचे चार स्लॅब आहेत. सध्या, 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार-स्तरीय GST दर स्लॅब आहेत जे भविष्यातही सुरू राहतील. आणि मंत्री गटाने 35 टक्के नवीन जीएसटी दर प्रस्तावित केला आहे.

महागड्या कपड्यांवर 28% GST लावणार!

सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 148 वस्तूंवरील जीएसटी दरांमध्ये बदल सुचवले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जीएसटी दरातील बदलाचा महसुलावर सकारात्मक परिणाम होईल. मंत्र्यांच्या गटाने कपड्यांवरील जीएसटी दर तर्कसंगत करण्याची शिफारस केली आहे. GoM ने 1500 रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर 5 टक्के GST दर कायम ठेवला आहे. परंतु 1500 ते 10,000 रुपयांच्या कपड्यांवर 18 टक्के जीएसटी आणि 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवर 28 टक्के जीएसटी लावण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कपडे देखील लक्झरी वस्तूंच्या श्रेणीत येतील.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *