ग्राहकांना महागाईचा फटका, दुधाचे दर प्रति लिटर इतके रुपए

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

ग्राहकांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. मदर डेअरीनंतर आता अमूलने देखील दुधाच्या दरामध्ये वाढ केली आहे. अमूलच्या दुधाचे दर दोन रुपयांनी वाढले आहेत. यापूर्वी मंगळवारी मदर डेअरीने दूध दरवाढीची घोषणा केली होती. मदर डेअरीने आपल्या दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवले होते. हे वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत. तर दुसरीकडे त्यानंतर आज अमूलने देखील आपल्या दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवले आहेत. ही दर वाढ उद्यापासून सर्वत्र लागू होणार आहे.

दुधाचे नवे दर

मदर डेअरीने आपल्या दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये मदर डेअरीच्या दुधाचे दर 54 रुपये प्रति लिटरवरून 56 रुपयांवर पोहोचले आहेत.तर फुल क्रीम दुधाचे दर 68 रुपये प्रति लिटरवरून 69 रुपये प्रति लिटर झाले आहेत. यासोबतच टोंड दूध पाउचची किंमत 56 रुपये प्रति लिटरवरून 57 रुपये प्रति लिटर एवढी झाली आहे. तर डबल टोंड दूधाची किंमत 49 रुपये प्रति लिटर वरून 51 रुपयांवर पोहोचली आहे. तर गायीच्या दुधाची किंमत प्रति लिटर 57 रुपयांवरून 59 रुपयांवर पोहोचली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये दुधाच्या दरात 4 ते 5 रुपयांची वाढ

याबाबत मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की, दुधाच्या खरेदी किमतीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे दुधाचे दर देखील वाढवण्यात आले आहेत. मदर डेअरी दर दिवशी अंदाजे 35 लाख लीटरच्या आसपास दूध विक्री करते.आम्ही ग्राहकांना चांगल्यात चांगलं दूध मिळावं आणि त्याची गुणवत्ता टिकावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं देखील या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे आता मदर डेअरीनंतर अमूलने देखील दुधाच्या दरात वाढ केली आहे. अमूलचे देखील दर वाढतच आहेत. आता पुन्हा एकदा दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. उद्यापासून हे दर सर्वत्र लागू होणार आहेत. दुधाचे दर दोन रुपयांनी वाढले आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *