लेखणी बुलंद टीम:
जेव्हा कायद्याचे रक्षक भक्षक बनतात, जेव्हा न्यायाची वाट पाहणाऱ्या व्यक्तीला सतत अपमान आणि छळाला सामोरे जावे लागते. सततच्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील नालासोपारा येथे घडली आहे.
जयप्रकाश चौहान वय वर्ष 64 असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्र लिहिले होते त्यात मी श्याम शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्याला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. ते दोघे माझ्या मृत्यूला जबाबदार आहे.
मंगळवारी जयप्रकाश यांनी घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. ते गेल्या अनेक महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होते. सततच्या छळाला आणि धमक्यांना ते कंटाळून गेले.आणि त्यांनी असे पाऊल घेतले.
जयप्रकाश चौहान यांनी नालासोपारा येथील एका इमारतीच्या पुनर्बांधणीची जबाबदारी घेतली होती. पोलीस कर्मचारी श्याम शिंदे यांनी त्यांच्या नातेवाईकामार्फत या प्रकल्पात 50 लाख रुपये गुंतवले होते, ज्यामध्ये त्यांना दुप्पट पैसे आणि 4फ्लॅट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
कालांतराने, बांधकामाला विलंब झाला, जसे की बहुतेकदा होते. पण नंतर श्याम शिंदे, राजेश महाजन आणि लाला लाजपत नावाच्या पुरुषांच्या गटाने चौहानवर प्रचंड दबाव आणण्यास सुरुवात केली. कुटुंबातील सदस्यांच्या मते, चौहानने या लोकांना 22 लाख रुपये ऑनलाइन आणि 10लाख रुपये रोख असे एकूण 32 लाख रुपये दिले होते. तरीही, धमक्या थांबल्या नाहीत.