लिपस्टिक खरेदी करताना अनेकदा आपल्याला फक्त रंग आवडतो म्हणून ती घेतली जाते, पण ती आपल्या चेहऱ्यावर शोभून दिसेलच असं नाही.स्किन टोननुसार लिपस्टिक शेड निवडणं अत्यंत महत्त्वाचं असतं.त्यामुळे तुमचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. सर्वात आधी आपला अंडरटोन (undertone) ओळखणं आवश्यक असतं – तो warm (उष्ण), cool (शीत) किंवा neutral (मध्यम) असतो.
उष्ण अंडरटोन असलेल्या त्वचेसाठी कोरल, ऑरेंज, ब्रिक रेड आणि वार्म न्यूड्स हे शेड्स उत्तम दिसतात.
शीत अंडरटोन असणाऱ्यांसाठी बेरी, प्लम, मव, पिंक आणि ब्लू-बेस्ड रेड हे शेड्स योग्य ठरतात.असल्यास तुमच्यावर बरेच रंग शोभतात – तुम्ही warm आणि cool दोन्ही प्रकारचे प्रयोग करू शकता.न्युट्रल अंडरटोन असल्यास तुमच्यावर बरेच रंग शोभतात – तुम्ही warm आणि cool दोन्ही प्रकारचे प्रयोग करू शकता.
गोऱ्या त्वचेसाठी सॉफ्ट पिंक, पीच किंवा न्युड शेड्स छान वाटतात.मध्यम गोरी त्वचेसाठी ब्रिक, मरून रंग सुंदर दिसतो, तर गव्हाळ किंवा सावळ्या त्वचेसाठी डीप रेड, ब्राऊन आणि वाइन शेड्स अत्यंत आकर्षक ठरतात.
लिपस्टिक निवडताना लाईटमध्ये टेस्ट करून पाहणं आणि शक्य असल्यास स्किनवर ट्राय करणं महत्त्वाचं आहे.
योग्य लिपस्टिक तुमचं आत्मविश्वासही वाढवतं!