वानखेडे स्टेडियममध्ये येत्या २७ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंन्टस् विरुद्ध मुंबई इंडियन्स असा क्रिकेट सामना रंगणार आहे. हा सामना मात्र मुंबई इंडियन्स वेगळ्याच प्रकारे साजरा करणार आहे.
२७ एप्रिलचा दिवस मुंबई इंडियन्स मुंबईतील विविध स्तरातील मुलांसाठी एक खास गिफ्ट देणार आहे. वास्तविक लखनऊ सुपर जायंट्सच्या विरोधात वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या मॅच दरम्यान फ्रेंचाइजी विविध स्तरातून आलेल्या तब्बल १९००० मुलांना गिफ्ट देणार आहे. यात २०० स्पेशल मुले देखील सामील होणार आहेत. हे सर्व जण आपआपल्या ऑयडॉलला लाईव्ह खेळताना पाहू शकणार आहेत. यांना सामना संपूर्णपणे मोफत पाहायला मिळणार आहे. या दिवशी मुंबई इंडियन्सच्या वतीने एज्युकेशन एण्ड स्पोर्ट्स फॉर ऑल इव्हेंटचे (ESA) सेलिब्रेट केले जाणार आहे. या फ्रेंचायजीची मालकीण नीता अंबानी यांनी या उपक्रमाची सुरुवात साल २०१० रोजी केली होती. त्यानंतर आयपीएल ( IPL) दरवर्षी हा इव्हेंट मुंबईच्या कोणत्याही एका मॅचमध्ये आयोजित करत असते.
पहिल्यांदा लाईव्ह क्रिकेट पाहाता येणार
मुलांना लाईव्ह क्रिकेटचा थरार पाहाता येणार आहे, यावेळी मुलांना आपल्या आवडत्या आयकॉन क्रिकेटस्टारशी बोलण्याची आणि वानखेडे स्टेडियमच्या जल्लोषपूर्ण वातावरणात सामन्याचा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे. हजारो मुलांना पहिल्यांदाच लाईव्ह क्रिकेट पाहण्यासाठी सधी मिळणार आहे. रिलायन्स फाउंडेशनने यासाठी विविध NGO शीं यासंदर्भात करार केला आहे.मुलांचे स्वागत करण्यापूर्वी नीता अंबानी यांनी त्यांच्या संघातील खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाला, “त्यांच्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करा.कारण ते क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी रांगेत उभे राहतात असेही नीता अंबानी यावेळी म्हणाल्या..