अग्रणी सोशल फौंडेशन च्या वतीने राबविले महिला हिंसाचार विरोधी अभियान

Spread the love

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड)  : अग्रणी सोशल फौंडेशन,विटा जि.सांगली यांचे वतीने वेजेगाव येथे महिलाहिंसाचार विरोधी अभियान राबविण्यात आले होते.यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून विटा पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक पुजा महाजन मॅडम होत्या.
यावेळी बोलताना उपनिरीक्षक महाजन म्हणाल्या की महिला हिंसाचार कमी करण्यासाठी महिलांनी धाडसाने तक्रार दाखल केली पाहिजे.पालकांनी आपल्या मुलींशी मित्रत्वाच्या नात्याने वागून त्यांचे प्रबोधन केले पाहिजे.जुन्या रूढी,परंपरा टाळून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.असे चौफेर विषयावर जनजागृती केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंपाताई गुरव होत्या.यावेळी कोरो विंग प्रोसेसच्या प्रभारी वैशालीताई यांनी लोकशाहीमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून दिले पाहिजे.महिलांनी एकमेकांशी सहकार्य करून राजकारणात सत्तेचे विकेंद्रीकरण,सक्रिय सहभागासाठी प्रयत्न केले पाहिजेत.यासाठी प्रशिक्षण देत आहोत.यापुढे वंचित समाज व महिलांचे नेतृत्व निर्माण झाले पाहिजे हाच उद्देश आहे.यावेळी पोलिस कॉन्स्टेबल खरमाटे मॅडम, एकलव्य अॅकॅडमीच्या मयुरी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.सुरूवातीला स्वागत, प्रास्ताविक व संविधान उद्देशिका वाचन संयोजिका शिल्पा गुरव यांनी केले.यावेळी तंबाखूविरोधी शपथ शाकिरा मुल्ला,महिला हिंसाचारविरोधी जस्मिन नदाफ,संपत्ती अधिकार कायदा पाकीजा शिकलगार व विधी सेवा समितीची माहिती मंगल देवकर यांनी दिली.यावेळी अग्रणी संस्थेच्या संचालिका अपेक्षा सावंत उपस्थित होत्या.

शेवटी आभारप्रदर्शन ललिता गुरव यांनी केले.कार्यक्रमाचे संयोजन नंदा मदने,रूपाली पाटोळे यांनी केले होते


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *