मराठीत प्रवाशाला उत्तर दिल नाही म्हणून बस कंडक्टरला मारहाण

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मराठीत प्रवाशाला उत्तर न दिल्याबद्दल राज्य परिवहन महामंडळाच्या बस कंडक्टरला मारहाण केल्याप्रकरणी कर्नाटकात चार जणांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या बेळगाव जिल्हा मुख्यालयाच्या बाहेर शुक्रवारी ही घटना घडली, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. कंडक्टरने शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, सुलेभावी गावात साथीदारासह बसमध्ये चढलेली एक मुलगी मराठीत बोलत होती. कंडक्टर म्हणाले तिला म्हणाले की, मला मराठी येत नाही आणि तिला कन्नडमध्ये बोलण्यास सांगितले. कंडक्टर म्हणाला, ‘मी जेव्हा म्हटलं की मला मराठी येत नाही, तेव्हा त्या मुलीने मला शिवीगाळ केली आणि म्हणाली की मराठी शिकायला हवं.’ अचानक मोठ्या संख्येने लोक जमले आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला.

पोलिसांनी सांगितले की, जखमी बस कंडक्टरला बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले आहे.व ‘कंडक्टरवरील हल्ल्याप्रकरणी आम्ही चार जणांना अटक केली आहे. तसेच १४ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून, कंडक्टरविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंडक्टरवर मुलीविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अद्याप पॉक्सो कायद्यांतर्गत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आम्हाला आरोपांची चौकशी करावी लागेल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

बेळगावमध्ये मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे आणि त्यांच्यातील एक भाग जिल्ह्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याची मागणी करत आहे, ज्याला राज्य तसेच तेथे राहणाऱ्या कन्नड भाषिक लोकांकडून तीव्र विरोध होत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *