“मस्तवाल गद्दार त्याचा पापाचा घडा फोडून तुरुंगात कांदे सोलायला पाठवा”; उद्धव ठाकरेंची टीका कोणावर?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

“मस्तवाल गद्दार त्याचा पापाचा घडा फोडून तुरुंगात कांदे सोलायला पाठवा. हा आधीच फुटला, राज्यसभेला संजय राऊत यांना देताना त्याचे मत फुटले. नामर्दाची औलाद, तुझी खेटराने पूजा करायची का? पोलीस आणि गुंड घेऊन फिरतो. मीच तुम्हाला हा उमेदवार दिला माझेच दुर्दैव आहे”, असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्यासाठी लढणारा आमदार पाहीजे की रडवणारा आमदार पाहिजे? आमदार पाहिजे की डाकू पाहिजे? शेवटच्या ओवरमध्ये चौकार षटकार मारायचे आहेत. मातृशक्तीला नमस्कार करतो. संभाजीनगरमध्ये गेले तिथला मिंध्येचा उमेदवार म्हणतो मत दिले नाही तर 3 हजार परत घेईल. कोल्हापूरचा मुन्ना धमकी देतो, मी त्याला सांगतो तू माझ्या माता बहिणींच्या केसाला धक्का लावला तर हात उखडून टाकेल, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या मुळावर आहेत त्याच गोष्टी मोदी शहा करत आहेत. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहेत म्हणून अनेक मुले शिक्षण घेत नाहीत. आपले सरकार आल्यावर मुलांना मोफत शिक्षण देणार आहोत. सोयाबीन आणि कांद्याचे भाव पडत आहेत. मोदींनी नारा दिला 400 पार पण तो लसनाने ऐकले, लसूणचे भाव 400 पार झाले.

मोदी अमित शहा गद्दाराचा प्रचारासाठी येत आहेत. आपले नाव ,निशाणी, सुख समाधान चोरले आणि अगदी बेशरमपणाने फिरतोय. याची दादागिरी 10 दिवसांत उतरवणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणायचे आहेत. हा लांडगा आहे, वाघचे कातडं लावून फिरत आहे. महिलांना सुरक्षा देणार, 3 हजार देणार, पुन्हा शेतकरी कर्जमुक्त करायचे. गुंड आणि मर्द यातील फरक त्याला दाखवा. मशाल पेटवायची आहे.

इथे आलेल्या माता भगिनीचे आशिर्वाद पाहिजेत. आई वडीलाचे आशीर्वाद पाहिजे. तुम्ही जर मर्दाची औलाद असला तर माझा वडिलांचा फोटो न लावता तुझ्या वडिलांचा फोटो लावा. त्या दाढीवल्या मिंधेला ही सांग तुझ्या वडिलांचा फोटो लाव.. निष्ठावंताच्या हातात तुमचे भविष्य द्यायचे की गद्दाराच्या हे ठरवा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *