वर्गमैत्रिणीवर बलात्कार आणि तिची हत्या करण्यासाठी मुलास चक्क 100 रुपयांची सुपारी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

हिंसा, हिंस्रता आणि विकृती केवळ प्रौढच नव्हे तर, लहान मुले आणि शालेय विद्यार्थ्यांमध्येही भिनत चालली आहे का? असा सवाल उपस्थित व्हावा, अशी धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थ्याने वर्गातील मुलीवर (Classmate) बलात्कार (Rape) आणि तिची हत्या (Murder) करण्यासाठी शाळेतील मुलाला चक्क 100 रुपयांची सुपारी दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील दौंड (Daund) तालुक्यातील प्रतिष्ठीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत (Daund English Medium School) 22 जानेवारी रोजी घडली. शालेय प्रशासनाने मात्र हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि वर्गशिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.

किरकोळ करणावरुन बलात्कारासाठी सुपारी?
पीडिता आणि कथीत मुलगा दौंड येथील प्रतिष्ठीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. शाळेतील एका वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने शाळेच्या कुठल्याशा कागदपत्रावर पालकाची खोटी सही केली. जी त्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने पाहिली आणि सदर मुलाच्या कृतीबाबात शिक्षकांना माहिती दिली. केवळ येवढ्याच कारणावरुन तो मुलगा चिडला आणि त्याने त्याचा राग मनात धरला. तो केवळ इतक्यावरच थांबला नाही. तर त्याने आपल्या वरच्या वर्गातील (इयत्ता नववी) विद्यार्थ्याशी संपर्क साधला.  या मुलाने वरच्या इयत्तेतील मुलास चक्क या मुलीवर आधी बलात्कार आणि मग तिला मारून टाकण्यासाठी 100 रुपयांची सुपारी दिली. हे सगळे घडल्यानंतर ज्या मुलास सुपारी देण्यात आली त्याच मुलाने  सदर प्रकाराची माहिती दिली. या घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आली आहे.

मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल
पीडित मुलीने घडला प्रकार आपल्या पालकांकडे कथन केला. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी शाळेत धाव घेत वर्गशिक्षक, शाळेचे सुपरवायझर आणि मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधला. घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला. मात्र, शालेय प्रशासनाकडून पालकांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. उलट शाळेची बदनामी होईल म्हणून हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केला. तसेच, मुख्यध्यापक आणि इतर शिक्षकांनी मुलीवरच दोषारोप करत वडील आणि पीडितेस मानसिक त्रास दिला. या धक्कादायक प्रतिसादानंतर पीडितेच्या पालकांनी थेट दौंड पोलीस स्टेशन गाठले आणि फिर्याद दिली. पोलिसांनी प्राप्त फिर्यादीवरुन शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर मानसिक त्रास, विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान आणि इतर आरोप आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *