बंगळुरूमधील ताज वेस्ट एंड हॉटेलला बॉम्बची धमकी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील ताज वेस्ट एंड हॉटेलला बॉम्बची धमकी मिळाली आहे. या हॉटेलला धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. हा मेल समोर आल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बेंगळुरू पोलिसांचे डीसीपी शेखर एचटी यांनी हॉटेल्सना धमकीचे ईमेल आल्याची पुष्टी केली आहे. माहिती मिळताच हॉटेलची सुरक्षा वाढवून तपास सुरू करण्यात आला. बॉम्बशोधक पथक आणि शहर पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये दाखल झाले आहे.तपास सुरु आहे.

पोलिसानी सांगितले की, शनिवारी बंगळुरूच्या रेसकोर्स भागात असलेल्या ताज वेस्ट अँड हॉटेल ला बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेल ने आली. पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक पोहोचले आणि हॉटेलच्या कान्याकोपऱ्याची तपासणी केली.
अज्ञात व्यक्तींकडून बॉम्बची धमकी मिळाल्याची पुष्टी केली. या धमकीमागील लोकांची ओळख पटवण्यासाठी सध्या तपास सुरू आहे. अलीकडच्या काळात, शाळा, रुग्णालये, सरकारी कार्यालये आणि अगदी विमानतळांना लक्ष्य करणाऱ्या बॉम्बच्या धमकीच्या ईमेलमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश धमक्या खोट्या असल्याचे सिद्ध झाले असले, तरी प्रशासनाकडून पूर्ण दक्षता घेतली जात आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *