लेखणी बुलंद टीम:
नागपूरमधील गणेश पेठेतील बसस्थानकाजवळील द्वारका हॉटेलमध्ये स्फोटक द्रव्य पेरण्यात आल्याचा दावा अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्बच्या धमकीच्या ईमेल पाठवण्यात आला. सूचना मिळताच पोलिसांनी तातडीने श्वानपथक आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह पथके घटनास्थळी रवाना केली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अधिका-यांनी हॉटेल आणि आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही संशयास्पद वस्तूंची पाहणी केली असता, आतापर्यंत कोणतेही स्फोटक यंत्र सापडले नाही. सध्या याठिकाणी शोध मोहीम चालू आहे. निनावी ईमेलचा स्रोत शोधण्याचे कामही अधिकारी करत आहेत.
नागपूरमधील बसस्थानकाजवळील द्वारका हॉटेलला बॉम्बची धमकी –
https://twitter.com/ians_india/status/1865994680112214466