पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाला आज, गुरुवार, २२ मे रोजी ईमेलद्वारे बॉम्बची धमकी (Bomb Threat) मिळाली. ज्यामुळे काही काळ तेथे घबराटीचे वातावरण होते. सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले. त्यांना तपासात काही सापडले नाही. या काळात कोर्टरूममध्ये सर्वांना प्रवेश स्थगित करण्यात आला होता. पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाने परिसराची सखोल तपासणी केली. वकिलांसाठी कोर्टरूमचा प्रवेश तात्पुरता थांबवण्यात आला होता. अहवालानुसार, जवळजवळ दोन तासांच्या तपासणीनंतर, अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कक्ष मोकळा केला आणि सामान्य कामकाज पुन्हा सुरू झाले.