अलिकडच्या काळात, अनेक सिनेस्टार्सनी (Bollywood Actors) मुंबईत (Mumbai News) मालमत्तांची खरेदी-विक्री (Buying And Selling Of Properties) केली आहे. अनेकांनी रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक (Investing In Real Estate) केली आहे. यामध्ये एकता कपूरपासून जितेंद्र, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सुभाष घई आणि सोनाक्षी सिन्हा यांसारख्या इतरही काही सिनेस्टार्सच्या नावांचा समावेश आहे. अशातच आता या यादीत बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) नावाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानं मुंबईतील (Mumbai News) वांद्र्यात असलेलं त्याचं एक अपार्टमेंट कोट्यवधींना विकलं आहे.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननं (Bollywood Actor Salman Khan) आपलं मुंबईतील वांद्रे इथे असलेलं घर विकलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवरून स्क्वेअर यार्ड्सनं मिळवलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांनुसार, त्याचं अपार्टमेंट 5.35 कोटी रुपयांना विकलं गेलं आणि जुलै 2025 मध्ये विक्रीची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानचं वांद्र्यातील आलिशान अपार्टमेंट मुंबईतील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक असलेल्या शिव अस्थान हाईट्समध्ये आहे. ही मालमत्ता 122.45 चौरस मीटर (अंदाजे 1,318 चौरस फूट) पसरलेली आहे. त्यात तीन कार पार्किंग स्पॉट्स देखील आहेत. ही मालमत्ता 5.35 कोटी रुपयांना विकली गेली, ज्यामध्ये 32.01 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क समाविष्ट होते.महत्त्वाची बाब म्हणजे, सलमान खान वांद्र्यातील ज्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो, त्यापासून विकलेलं घर 2.2 किलोमीटर अंतरावर आहे.
सलमान खाननं अपार्टमेंट विकलं आणि जुलै 2025 मध्ये त्याची नोंदणी केली
सलमान खानचं अपार्टमेंट ज्या भागात आहे, तो परिसर मुंबईतील टॉप रिअल इस्टेट हब मानला जातो. ‘मनी कंट्रोल’च्या वृत्तानुसार, सलमान खाननं जुलै 2025 मध्ये त्याच्या अपार्टमेंटची नोंदणी केली. या करारासाठी 32.01 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले.
गॅलेक्सी अपार्टमेंट्समधील सलमानच्या घराची किंमत काय?
सलमान खानच्या सर्वात महागड्या वस्तू आणि मालमत्तेबद्दल बोलायचं झालं तर, त्याच्याकडे गॅलेक्सी अपार्टमेंट्स आहे, ज्यामध्ये त्याच्याकडे तळमजल्यावर 1 बीएचके अपार्टमेंट आहे. तो त्यात राहतो, तर त्याचे पालक पहिल्या मजल्यावर राहतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची किंमत 16 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.
सलमान खानचं पनवेल फार्महाऊस आणि त्याची किंमत
पनवेलमध्ये सलमानचं फार्महाऊस आहे, ज्याची किंमत 80 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. ते 150 एकरमध्ये पसरलेलं आहे आणि आजूबाजूला भरपूर हिरवळ आहे. सलमान खान इथे शेती देखील करतो आणि अनेकदा सुट्टीसाठी जातो.
सलमान खानचा वांद्रे येथील 30 कोटी रुपयांचा ट्रिपलॅक्स अपार्टमेंट
सलमान खानचं वांद्रे येथे एक ट्रिपलॅक्स अपार्टमेंट देखील आहे. त्यात एक स्विमिंग पूल, एक पार्टी हॉल आणि एक प्रशस्त लिव्हिंग एरिया आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या वृत्तानुसार, त्याची किंमत 30 कोटी रुपये आहे. याशिवाय सलमाननं त्याच्या 51 व्या वाढदिवशी मुंबईतील गोराई बीचवर 5 बेडरूमचं बीच हाऊस खरेदी केलं आहे. त्याची किंमत 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. त्यात एक मोठा स्विमिंग पूल, एक प्रायव्हेट थिएटर, जिम आणि बाईक एरिया आहे.
सांताक्रूझमध्ये 120 कोटी रुपयांची व्यावसायिक मालमत्ता
सलमान खानची दुबईमध्येही मालमत्ता आहे. त्याचं बुर्ज खलिफाजवळ एक आलिशान अपार्टमेंट आहे. याशिवाय, 2012 मध्ये त्यानं सांताक्रूझमध्ये एक कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केली, ज्याची किंमत 120 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, ती 2900 कोटी रुपये आहे. तो देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-10 स्टार्समध्ये आहे.
सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सलमान शेवटचा ‘सिकंदर’ चित्रपटात दिसला होता, जो फ्लॉप झाला. आता तो ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटात दिसणार आहे, ज्याचं दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहे. हा चित्रपट 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या युद्धावर आधारित आहे.