बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरचे एक्स हजबँड प्रसिद्ध बिझनेसमन संजय कपूर यांचं निधन

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

बॉलिवूडची अभिनेत्री (Bollywood Actress) करिश्मा कपूरच्या (Karishma Kapoor) एक्स हजबँडचं निधन झालं आहे. फिल्मफेयरच्या रिपोर्टनुसार, यूकेमध्ये पोलो खेळत असताना हार्ट अटॅक आल्यामुळे प्रसिद्ध बिझनेसमन संजय कपूर (Businessman Sunjay Kapur) यांचं निधन झालं आहे. ते 53 वर्षांचे होते. धक्कादायक बाब म्हणजे, गुरुवारी झालेल्या अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी श्रद्धांजली वाहणारी पोस्ट संजय कपूर यांनी केली होती. ती त्यांची अखेरची पोस्ट ठरली. अभिनेत्री करिष्मा कपूरसोबत घटस्फोट झाल्यानंतर संजय कपूर यांनी अभिनेत्री प्रिया सचदेवसोबत लग्नगाठ बांधलेली. दोघांना एक सात वर्षांचा मुलगा आहे.

अहमदाबाद विमान दुर्घटनेवर संजय कपूर यांची शेवटची पोस्ट
संजय कपूर यांची शेवटची पोस्ट 12 जून रोजी अहमदाबाद विमान अपघातावर होती. अहमदाबादमध्ये झालेल्या या दुःखद विमान अपघातात विमानातील फक्त एक प्रवासी वगळता सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर विमान रहिवाशी भागात कोसळलं, त्यावेळी तेथील काही स्थानिक लोकांनाही आपले प्राण गमवावे लागले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या विमान अपघातात मृत्यू झाला आहे

या दुःखद अपघाताबद्दल शोक व्यक्त करताना संजय कपूर यांनी लिहिलेलं की, “अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची दुःखद बातमी आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना सर्व पीडित कुटुंबांसोबत आहेत. या कठीण काळात देव त्यांना शक्ती देवो.”

करिष्मा कपूरसोबत झालेलं लग्न अन् नंतर घेतलेला घटस्फोट
बॉलीवूड अभिनेत्री आणि संजय कपूर यांचं 2003 मध्ये लग्न झालेलं. दोघांचं नातं फक्त 13 वर्ष टिकलं. 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. करिश्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर यांनी अभिनेत्री प्रिया सचदेवशी लग्न केलं.

संजय आणि करिश्माला दोन मुलं आहेत. मुलगी बडी समायरा आणि मुलगा छोटा कियान. मुलगी आता 19 वर्षांची आहे. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांचा सांभाळ करिश्मा कपूर करतेय. घरगुती हिंसाचाराच्या आरोपांनंतर करिष्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोट झाला होता.

संजय कपूर आणि प्रिया सचदेवला सात वर्षांचा मुलगा
प्रिया सचदेव आणि संजय कपूर गेल्या 8 वर्षांपासून एकत्र होते. संजय कपूर आणि प्रिया सचदेव यांना अझारियस नावाचा एक मुलगा देखील आहे. करिष्मा कपूरसोबत घटस्फोट झाल्यानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेव यांच्याशी लग्न केलं. 2018 मध्ये दोघांना एका मुलाला जन्म दिला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *