लेखणी बुलंद टीम:
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Former CM Vasundhara Raje) यांच्या ताफ्यातील बोलेरो गाडी उलटली (Car Overturned). या अपघातात 7 पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना बाली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुपराम, भाग चंद, सूरज, नवीन आणि जितेंद्र अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे मंत्री ओटा राम देवासी यांच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांच्या मुंदरा गावातून जोधपूरला परतत असताना हा अपघात झाला.
जखमी पोलिस रुग्णालयात दाखल –
माजी मुख्यमंत्र्यांना याची माहिती मिळताच त्या जखमींकडे पोहोचल्या. यानंतर वसुंधरा राजे यांनी जखमी पोलिसांना रुग्णवाहिकेत बसवून बाली येथील सरकारी रुग्णालयात पाठवले. जखमींवर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचारानंतर पोलिसांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
वसुंधरा राजे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून या घटनेची माहिती दिली. त्यांनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले की, ‘मुंदराहून जोधपूरला परतत असताना त्यांच्या मागून आलेली पोलिस जीप उलटल्याने पोलीस कर्मचारी रूपराम जी, भागचंद जी, सूरज जी, नवीन जी आणि जितेंद्र जी जखमी झाले. जखमी पोलिसांना तात्काळ रुग्णवाहिकेतून बाली शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. त्याची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी माझी इच्छा आहे.
पहा पोस्ट:
https://twitter.com/VasundharaBJP/status/1870806383320334778