बिग बॉस मराठी 5 चा सीझन अंतिम टप्प्यात,100 नाही तर 70 दिवस,वाचा सविस्तर

Spread the love

लेखनी बुलंद टीम:

बिग बॉस मराठी सीझन 5 (Bigg Boss Marathi 5) यंदा 100 ऐवजी 70 दिवसांतच प्रेक्षकांची रजा घेणार आहे. या सीझन मध्ये केवळ संग्राम चौघुले वाईल्ड कार्ड म्हणून घरात आला पण तो देखील दुखापतीमुळे बाहेर पडला आणि काल अरबाज पटेलच्या एक्झिटनंतर बिग बॉसने 14 दिवसात आता महाअंतिम सोहळा रंगणार असल्याची घोषणा केली आहे. बिग बॉसने यंदाचा सीझन ब्लॉकबस्टर ठरला असला तरीही तो लवकर निरोप घेणार असल्याची घोषणा केली आहे. या आठवड्यात आता बिग बॉस कडून सारे आठ ही सदस्य नॉमिनेट करण्यात आले आहेत.

बिग बॉस मराठी सीझन 5 चा महाअंतिम सोहळा
बिग बॉस मराठी सीझन 5 चा अंतिम सोहळा आता 14 दिवसांत म्हणजे 6 ऑक्टोबरला रंगणार आहे. खुद्द बिग बॉसनेच या ट्वीस्टची माहिती दिली आहे. सध्या खेळामध्ये असलेले सारे सदस्य म्हणजे अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिजित सावंत, पंढरीनाथ कांबळी, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेदार, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगावकर नॉमिनेट झाल्या आहेत.

हिंदी आणि मराठी बिग बॉसची टक्कर 6 ऑक्टोबरला
मराठी बिग बॉस निरोप घेण्याची आणि हिंदी बिग बॉसच्या सुरूवात यांची टक्कर होणार आहे. 6 ऑक्टोबरला एकीकडे मराठी बिग बॉसचा महाअंतिम सोहळा रंगत आहे तर त्याच दिवशी सलमान खान हिंदी बिग बॉस सीझन 18 देखील सुरू होत आहे. सलमान खानच्या पहिल्या प्रोमो मध्ये ‘अब होगा टाईम का तांडव’ म्हणत त्याची घोषणा करण्यात आली आहे.

बिग बॉस मराठी 5 चा सीझन आता अंतिम टप्प्यामध्ये आला असल्याने यामध्ये शेवटच्या टप्य्यात आता क्षणोक्षणी ट्विस्ट अपेक्षित आहेत. घरातील सदस्यांना अंतिम फेरीत गाठण्याकरिता नव्या आणि अधिक कठीण आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. नुकताच अरबाझ पटेल खेळातून बाहेर पडल्याने एकटी पडलेली निक्की कसं निभावून नेणार आणि टीम बी मध्ये या आव्हानांमध्ये एकजूट टिकवण्यात यशस्वी राहणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *