मोठी अपडेट! आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेच्या यजमानपदाचा मान पाकिस्तानकडे असल्यामुळे टीम इंडियासाठी ‘हा’ मोठा निर्णय

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन हे हायब्रिड मॉडेलनेच होणार असल्याचं जाहीर केलं आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे सामने हे त्रयस्थ ठिकाणी होणार आहेत. बीसीसीआयने टीम इंडियाला सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर बीसीसीआयची मागणी मान्य करत आयसीसीने भारताचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार असल्याचं जाहीर करत आडमुठ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका दिला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *