लेखणी बुलंद टीम:
रतन टाटा यांच्या निधनानंतर भारतरत्नची मागणी वाढली आहे. या संदर्भात महाराष्ट्रातील शिंदे सरकारने एक महत्वपूर्ण प्रस्ताव मंजूर केला आहे. ज्यामध्ये केंद्राला विनंती करण्यात आली आहे की, प्रसिद्ध उदयोगपती रतन टाटा यांना देशाचा सर्वोच्च नागरिक सम्मान ‘भारतरत्न’ ने सन्मानित करण्यात यावे. त्यांचे योगदान आणि कामगिरी ओळखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. रतन टाटा यांनी भारतीय उद्योगमध्ये जी भूमिका निभावली आहे. याकरिता ते या सन्मानासाठी पात्र मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज गृहमंत्री अमित शहा मुंबईत उद्योगपती रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहे. तसेच या महान उद्योगपतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुरुवारी राज्याचा शोक जाहीर केला आहे.