गणेशोत्सवामध्ये पुणेकरांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. पुणे मेट्रोने आपल्या दोन्ही मार्गांवर- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) ते दिवाणी न्यायालय आणि वनाझ ते रामवाडी, कामकाजाचे तास वाढवले आहेत. उद्या, 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत पुणे मेट्रो दररोज 17 तास म्हणजेच सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 10 ते 16 सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना सकाळी 6 ते मध्यरात्री या वेळेत मेट्रो सेवा वापरता येणार आहे. पुणे मेट्रो अनंत चतुर्दशीला, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण 24 तास धावेल. त्यानंतर 8 सप्टेंबरपासून, मेट्रो सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत पूर्ववत होईल. या वाढीव सेवा तासांमुळे पुणे मेट्रोच्या महसुलात गतवर्षीप्रमाणे लक्षणीय फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
पुणे मेट्रोने त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर लिहि, ‘गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी नागरिक मोठ्याप्रमाणावर शहराच्या मध्य भागात येत असतात. नागरीकांच्या सुविधेसाठी मेट्रोच्या वेळात बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे. तसेच मेट्रो फेऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा.’