मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्य़ा या निर्णयामुळे भारताला मोठा फटका

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवर ५०% कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ३९ हजार कोटी रुपयांची निर्यात धोक्यात आली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवर ५०% कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका भारतासह जगभरातील देशांना बसणार आहे. याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर, स्थानिक उत्पादनावर, किंमतींवर आणि व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय स्टील कंपन्या स्थिर आहेत. मात्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आगामी काळात याचा फटका भारताला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भारताच्या ३९ हजार कोटींच्या उत्पादनांना फटका बसण्याची शक्यता आहे.

भारतातील लोखंड किंवा स्टीलपासून बनलेल्या उत्पादनांचा याचा बसू शकतो. खासकरुन ऑटोमोबाईल्स, ऑटो पार्ट्सच्या निर्यातीवर येणाऱ्या काळात अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या टॅरिफ धोरणामुळे जागतिक व्यापार परिस्थिती बदलू शकते, ज्यामुळे भारतासह अनेक देशांच्या निर्यातदारांना नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते.

भारताच्या निर्यातीवर परिणाम होणार

भारतात बनलेल्या बऱ्याच वस्तू अमेरिकेला निर्यात केल्या जातात. म्हणजेच अमेरिका ही भारतासाठी एक महत्त्वाची निर्यात बाजारपेठ आहे. स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवर ५०% कर लादल्याने भारताकडून अमेरिकेला होणारी निर्यात कमी होऊ शकते. याचा परिणाम भारतातील स्टील आणि अॅल्युमिनियम उद्योगावर होऊ शकतो. कारण कर वाढल्याने उत्पादनांच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे.

ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या आकडेवारीनुसार, भारताने आर्थिक वर्ष 25 मध्ये अमेरिकेला सुमारे $4.56 अब्ज किमतीचे स्टील, अॅल्युमिनियम आणि संबंधित उत्पादने निर्यात केलेली. यात लोह आणि स्टील उत्पादनांची निर्यात $587.5 दशलक्ष, लोह किंवा स्टील वस्तूंची निर्यात $3.1 अब्ज, अॅल्युमिनियम आणि संबंधित वस्तूंची निर्यात $860 दशलक्ष इतकी आहे. यातील बहुतांशी उत्पादने ही महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू येथील आहेत.

स्थानिक उत्पादन आणि किमतींवर परिणाम होणार

डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या या ५० टक्के कराचा उद्देश अमेरिकेतील स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देणे आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादकांना फायदा होणार आहे. यामुळे अमेरिकेत स्टील आणि अॅल्युमिनियमच्या किमती वाढू शकतात. याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *