मोठी बातमी! ५ तारखेला होणार या मंत्र्यांचा शपथविधी, बाकीच्यांचे कधी?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

महाराष्ट्रात महायुतीला मोठे बहुमत मिळून देखील दहा दिवस झाले तरी सरकार स्थापन झालेले नाही. आता अखेर महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळ्याची तारीख निश्चित झालेली आहे. गुरुवार ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात समारंभ होणार आहे.सीएम आणि दोन डेप्युटी सीएम शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी खास या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या आधी भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. भाजपाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात पाठविले आहे.यांच्या उपस्थिती भाजपच्या विधीमंडळ पक्ष नेत्याची निवड होणार आहे. त्यानंतर हे नावाची माहिती पक्षश्रेष्टींना दिली जाणार आहे. त्यानंतरच मुख्यमंत्र्‍यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

या आधी मुंबईत महायुतीच्या तीन्ही घटक पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी मिटींग घेतली जाणार आहे. नव्या मुख्यमंत्र्‍यांच्या नावापासून ते मंत्रिमंडळातील सदस्यांच्या नावावर या बैठकीत सहमती घेतली जाणार आहे. परंतू एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती बरी नसल्याने त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल केलेले आहे. त्यामुळे बैठका पुढे ढकल्यात येत आहेत. शिंदे यांच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात येत आहे. त्यांना ताप आल्याने कमजोरी आली आहे. तसेच पांढऱ्या पेशींची संख्या देखील वाढलेली आहे. त्यांना घशाचा संसर्ग देखील झालेला आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरुन महायुतीत एकनाश शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरुन स्पर्धा सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र पद पुन्हा मिळावे अशी इच्छा एकनाथ शिंदे यांची आहे. परंतू भाजपाच्या पक्षश्रेष्टींना त्यासाठी साफ नकार देत मुख्यमंत्री यंदा भाजपाचा होणार असा फैसला सुनावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात गृहमंत्रीपद किंवा इतर मोठे पद मिळावे अशी एकनाथ शिंदे यांची मागणी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा रुसवा आता भाजपा पक्ष श्रेष्टी कसा काढतात याकडे सर्व लक्ष लागले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *