जाणून घ्या वैष्णवीचे लग्न ते बाळाचा ताबा संपूर्ण घटनाक्रम

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

जिल्ह्यातील पिंपरी येथील वैष्णवी हगवणे (Vaishnavi hagwane) हिने सासरच्या छळाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. वडिलांनी मोठ्या थाटामाटात लेकीचं लग्न लाऊन दिलं. दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हेही या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. हुंडा म्हणून लेकीला 51 तोळे सोनं आणि जावयाला फॉर्च्युनर कारही गिफ्ट करण्यात आली. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच वैष्णवीचा छळ सुरू झाला. सासू, सासरे, नणंद, दीर आणि चक्क प्रेमविवाह केलेल्या नवऱ्याकडून देखील वैष्णवीचा छळ करण्यात येऊ लागला. त्यामुळे, सासरचा जाच असह्य झाल्याने वैष्णवीने हगवणे यांच्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील (Pune) या घटनेनंतर वैष्णवीच्या वडिलांनी हगवणे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले असून पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे.

वैष्णवीला जिवंत असताना आणि वैष्णवीच्या आई-वडिलांना लेकीच्या मृत्यूनंतरही मोठा त्रास सहन करावा लागला. वैष्णवीचं 11 महिन्यांचं बाळ देण्यासही हगवणे कुटुंबीयांनी नकार दिला. त्यामुळे, आधीच लेकीच्या मृत्यूने शोकसागरात असलेल्या कस्पटे कुटुंबीयांना गुंडगिरी आणि व्यवस्थेचा त्रास सहन करावा लागला. मात्र, अखेर माध्यमांनी दखल घेतल्यानंतर राजकीय नेत्यांना आणि पोलीस प्रशासनाला जाग आली. महिला आयोगही खडबडून जागा झाला असून अखेर वैष्णवीचं बाळ तिच्या आई-वडिलांकडे म्हणजेच आजी-आजोबांकडे सुखरुप देण्यात आलंय.

वैष्णवीचे लग्न ते बाळाचा ताबा संपूर्ण घटनाक्रम
28 एप्रिल 2023 ला वैश्नवी आणि शशांक यांचं लग्न झालं .
21 जुलै 2024 ला वैश्नवीने मुलाला जन्म दीला. मात्र बाळाच्या जन्मानंतर ही वैश्नवीचा छळ थांबला नाही.
नऊ महिन्यांच्या तीच्या बाळाबद्दल देखील संशय घेण्यात आल्याने वैश्नवी व्यथीत झाली.
या छळाला कंटाळुन वैश्नवीने 16 मे ला हगवणे यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली.
20 मे रोजी राजेंद्र हगवणे यांचे मोठे बंधू जयप्रकाश हगवणे यांनी वैष्णवीच्या मामांना फोन करुन नऊ महिन्यांच हे बाळ खूप रडत असुन बाळाला तुम्ही घेऊन जा असं सांगीतलं .
त्यांच दीवशी कस्पटे कुटुंबातील सदस्य मुलाला घेण्यासाठी कर्वे नगरमधील पत्त्यावर पोहचले तेव्हा ते घर निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीच असल्याच त्यांना समजलं .
गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या निलेश चव्हाण ने बाळ देण्यास नकार दिला आणि पिस्तुलाचा धाक दाखवत कस्पटे कुटुंबाला हुसकाऊन लावलं .
त्यानंतर कस्पटे कुटुंबीय वारजे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. तीथे हद्दीचे कारण देत त्यांना बावधन पोलीसांकडे पाठवण्यात आलं.
बावधन पोलीसांनी सहकार्य करण्यास नकार दिला आणि बाळाचा ताबा न्यायालयातुन घेण्याचा सल्ला दिला.
गुरुवारी 22 तारखेला सकाळी दहा वाजता वैश्नवीचे काका मोहन कस्पटे आणि मामा उत्तम बहीरट निलेश चव्हाणच्या घरी पुन्हा बाळाला आनण्यासाठी पोहचले. मात्र चव्हाणांच्या घराचा दरवाजा उघडण्यात आला नाही.
त्याचवेळी मोहन कस्पटे यांना हे बाळ पिरंगुट गावातील पोवळे नावाच्या कुटुंबाच्या घरी असल्याचा फोन आला.
त्यानंतर मोहन कस्पटे पीरंगुटला जाण्यासाठी निघिले. मात्र अर्ध्या वाटेत असताना त्यांना पुन्हा फोन आला आणि त्यांना पुणे – बेंगलोर हायवेवर येण्यास सांगण्यात आलं.
हायवेवर अज्ञात व्यक्तीने हे बाळ मोहन कस्पटेंकडे सोपवलं
दुपारी 12 वाजता मोहन कस्पटे बाळाला घेऊन घरी पोहचले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *