विद्यापीठाने हिवाळी सत्रासाठी विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या तारखा (Exam Dates) जाहीर केल्या आहेत. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील परीक्षांचा समावेश आहे. दरम्यान हिवाळी सत्र 2024 मध्ये आयोजित या परीक्षांमध्ये कॉमर्स आणि मॅनेजमेंट विद्याशाखे अंतर्गत थर्ड इयर बीकॉम, बीकॉम फायनान्शिअल मार्केटमार्केट, बॅंकिंग अॅीन्ड इन्श्युरन्स, अकॉऊन्टींग अँड फायनान्स आणि बीएमएस यांच्या पाचव्या सिमेस्टरच्या परीक्षा 23 ऑक्टोबर 2024 पासून आयोजित करण्यात आल्या आहेत.
बॅचलर ऑफ आर्ट्स मध्ये पाचव्या सत्राच्या परीक्षा 13 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार आहेत. LLB (3-Year)आणि LLB (5-Year) च्या अनुक्रमे सत्र 5 आणि 9 च्या परीक्षा 19 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे.
Faculty of Science and Technology मध्ये B.Sc., B.Sc. (Computer Science), Biotechnology, Information Technology, Forensic, आणि Data Science ची परीक्षा 13 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. यामध्ये अनेक डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्तरावरील परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
दरम्यान इंजिनियरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी आणि MCA च्या परीक्षांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. नक्की वाचा: NCERT New Update: NCERT कडून बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी नव्या मूल्यांकन पद्धतीचा विचार .
मुंबई विद्यापीठाचं परीक्षांचं वेळापत्रक सविस्तर कुठे पहाल?अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
होम पेज वर परीक्षांच्या वेळापत्रकाची लिंक पहा.
आता त्यावर क्लिक करून तुमच्या समोर वेळापत्रक दिसेल.
तुमच्या परीक्षेचं वेळापत्रक नीट तपासून डाऊनलोड करून ठेवा.
दरम्यान परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळोवेळी वेबसाईटवरील अपडेट्स पाहणं अपेक्षित आहे.