अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे. येत्या 28 ऑगस्टपासून भारतीय वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे. मात्र भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो हे सांगताना मोठं भाकीत केलं आहे, ट्रम्प यांच्या या टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे खुद्द अमेरिकेतील लोकांना देखील ट्रम्प यांच्या या भूमिकेवर विश्वास नसल्याचं आता समोर आलं आहे. एस अँण्ड पी ग्लोबल रेटिंग्सचे डायरेक्टर यीफार्न फुआ यांनी याबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्था प्रभावित होणार नाही, भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण भारत ही एक ट्रेड ओरिएंटेड एकोनॉमी नाहीये, त्यामुळे याचा फारसा परिणाम होणार नसल्याचं यीफार्न फुआ यांनी म्हटलं आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो?
भारतीय अर्थव्यवस्थेवर टॅरिफचा काय परिणाम होऊ शकतो, यावर भाष्य करताना यीफार्न फुआ यांनी म्हटलं आहे की, मला नाही वाटत टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही निगेटिव्ह परिणाम होईल म्हणून, कारण भारत हा असा देश आहे, ज्याची अर्थव्यवस्था ही अधिक ट्रेड ओरिएंटेड इकोनॉमी नाहीये, जर तुम्ही सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) तुलनेत निर्यातीच्या बाबतीत भाराताची अमेरिकेच्या संदर्भातील निर्यात जोखमी पाहिली तर ती केवळ दोन टक्के आहे. S&P च्या अंदाजानुसार टॅरिफनंतर देखील भारताच्या जीडीपी वाढीचा दर हा 6.5 टक्के राहणार आहे, म्हणजेच तो गेल्या वर्षी इतकाच राहणार आहे, त्यामुळे टॅरिफचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही, असं म्हणू शकतो असं यीफार्न फुआ यांनी म्हटलं आहे. जर तसं झालं तर हा भारतासाठी मोठा दिलासा असणार आहे.