मोठी बातमी! शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला आयशर टेम्पोने दिली धडक

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांचा मुंबईतील जोगेश्वरी (Jogeshwari) येथील एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ (SRPF Camp Entrance) कार अपघात (Car Accident) झाला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ आयशर टेम्पोने वायकर यांच्या वाहनाला धडक दिली. अपघाताच्या वेळी रवींद्र वायकर कारमध्येच होते.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राप्त माहितीनुसार, अपघातावेळी टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही.

लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट नेत्याचा केला पराभव –
2024 च्या लोकसभा निवडणुकीत वायकर यांनी वायकर मुंबई मतदारसंघातून ठाकरे गटातील अमोल कीर्तीकर यांचा पराभव करून विजय मिळवला. अलिकडेच रवींद्र वायकर यांनी शिवसेना (UBT) मधून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता.

अमोल कीर्तिकर यांची याचिका न्यायालयाने फेटाळली –
मुंबई हायकोर्टाने शिवसेना यूबीटी नेते अमोल कीर्तिकर यांची रवींद्र वायकर यांच्या लोकसभा विजयाविरोधातील निवडणूक याचिका फेटाळून लावली होती. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. शिवसेनेचे यूबीटी उमेदवार अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्यात या मतदारसंघात लढत झाली. सुरुवातीला कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आले. परंतु, नंतर वायकर विजयी झाले. यामुळे कीर्तिकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, कीर्तिकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *