काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. हे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
शवविच्छेदन अहवालानुसार संतोष देशमुख यांच्या शरीराच्या बहुतांश भागावर मारहाणीच्या जखमा होत्या. मारहाणीमुळे त्यांचं अंग काळे निळे पडले होते. नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण सुरू होती.संतोष देशमुख यांना इतकं मारण्यात आलं की त्यांना मारण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाईपचे तुकडे झाले
संतोष देशमुख यांच्या हनुवटीवर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. कपाळ आणि दोन्ही गालावर जखमांच्या खुणा आहेत.
पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याने जखमा झाल्या आहेत. नाकातून रक्त बाहेर येऊन सुकले. छाती गळ्यावरील समोरील उजव्या बाजूला जखमांच्या खुणा
संतोष देशमुख यांच्या छातीवर उजव्या व डाव्या बाजूला तसेच बरगडीवर मारहाणीमुळे जखमा होत्या. देशमुख यांच्या डाव्या खांद्यावर जखमा. मारहाणीमुळे जखमांच्या खुणा काळ्या-निळ्या झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.
संतोष देशमुखांच्या दंडावर, कोपऱ्यावर, मनगटावर, हाताच्या मुठीवर तसेच मधल्या बोटाला जखमा आहेत. मारहाणीमुळे त्यांचा हात काळा निळा पडलेला होता, असे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.
सरपंच देशमुख यांच्या पायाच्या पोटरीवर जखमा झाल्याने काळे निळे पडल्या होत्या. मांडीवर, गुडघ्यावर तसेच नडगीवर मारहाणीच्या जखमा असून काळ्या निळ्या पडल्या. तसेच मारहाणीमुळे त्यांची संपूर्ण पाठ काळी-निळी पडली होती, असे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी बीडमधील केज तालुक्यात हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर बीडसह राज्यभरातील वातावरण तापले होते. वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. सीआयडीने यासंदर्भात न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खटला लढवण्यासाठी राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून