लेखणी बुलंद टीम:
दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यापूर्वी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली होती. रेखा गुप्ता आज दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आज दिल्लीचे उपराज्यपाल ऐतिहासिक रामलीला मैदानावर रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री देखील उपस्थित राहणार आहे.
रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी रामलीला मैदानावर त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
आयएमडीनुसार, उत्तर भारतातील हवामानात मोठा बदल होईल. पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे, पुढील २ ते ३ दिवस म्हणजे २० ते २१ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली-एनसीआर, नोएडा, हरियाणा-पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये वादळासारख्या जोरदार वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. रेखा गुप्ता दिल्लीतील रामलीला मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत इतर सहा आमदारही शपथ घेतील.
-रेखा गुप्ता यांच्या शपथविधी समारंभापूर्वी भाजप आमदार अनिल गोयल म्हणाले, “रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार तातडीने कारवाई करेल. त्यांना ही जबाबदारी केवळ त्या एक महिला असल्याने देण्यात आली नाही तर त्या ही जबाबदारी पार पाडण्यास सक्षम आहे म्हणून देण्यात आली आहे.”