मोठी बातमी! रिचार्ज प्लॅनच्या किमती पुन्हा वाढणार, वाचा सविस्तर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

दूरसंचार कंपन्या ग्राहकांना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती पुन्हा वाढणार आहेत. मोबाईल रिचार्ज प्लॅनचे दर १०-१२ टक्के महाग होऊ शकतात. मे महिन्यात यूजरची संख्या वाढल्यामुळे कंपन्या किमती वाढवण्याचा विचार करत आहेत. या वर्षाच्या शेवटपर्यंत कंपन्या रिचार्ज प्लॅन महाग करणार आहे. दूरसंचार कंपन्यांनी मागील वर्षी मोबाईल रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले होते. आता कंपन्यांनी पुन्हा दर वाढवले तर ग्राहक नंबर पोर्ट करु शकतात, असे म्हटले जात आहे.

डेटाची लिमिट कमी करणार
इकनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, कंपन्या मोबाईल रिचार्जचे दर वाढवण्याबरोबर आणखी एका धोरणावर विचार करत आहे. कंपन्या आपल्या प्लॅनमध्ये ‘टायर्ड प्राइसिंग’ लागू करणार आहे. त्याचा अर्थ सध्याच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणारा डेटाची लिमिट कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना वारंवरा डेटा पॅक रिचार्ज करावा लागणार आहे. तसेच कंपन्या लहान आणि स्वस्त डेटा पॅक बाजारात आणत आहे. त्यामुळे ग्राहक डेटा पॅकवर अवलंबून असणार नाही.

मे महिन्यात यूजर वाढले
मे महिन्यात ७.४ दशलक्ष म्हणजेच ७४ लाख यूजर वाढले आहे. गेल्या २९ महिन्यांतील ही सर्वाधिक वाढ आहे. एक्टिव्ह यूजरची संख्या १.०८ अब्ज म्हणजेच १०८ कोटींवर पोहोचली आहे. यापूर्वी जुलै ते नोव्हेंबर दरम्यान २.१ कोटी यूजर कमी झाले होते. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून सातत्याने यूजर वाढत आहे. जिओमध्ये सर्वाधिक ५.५ दक्षलक्ष यूजर वाढले आहे. सध्या जिओचा एक्टिव्ह यूजरचा शेअर ५३ टक्के झाला आहे. एअरटेलने १.३ दक्षलक्ष नवीन यूजर जोडले आहे. त्यांचा वाटा ३६ टक्के झाला आहे.

या कंपनीचे यूजर झाले कमी
इकनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, टेलीकॉम क्षेत्रातील तज्ज्ञाने सांगितले की, मे महिन्यात यूजर वाढले आहे. कारण असे बरेच यूजर होते ते विशिष्ट गरजेच्या वेळी वेगळी सिम वापरत होते. ते यूजर आता सक्रीय झाले आहे. ब्रोकरेज कंपनी जेफरीजने म्हटले की, जिओ आणि एअरटेल सारख्या मोठ्या ऑपरेटर्सचे यूजर वाढले आहे. यामुळे या कंपन्यांना रिचार्ज प्लॅन पुन्हा महाग करण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे, व्होडाफोन आयडिया सतत यांचे यूजर कमी होत आहे. त्याचा फायदा जिओ आणि एअरटेलला होता आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *