मोठी बातमी! रतन टाटा यांच्यावर वरळीच्या स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार, रात्री 9 पर्यंत वाहतूक निर्बंध

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले होते. रतन टाटा यांचे पार्थिव नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे ठेवण्यात आले आहे. येथे दुपारी 4 वाजेपर्यंत लोकांना अंतिम दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर सायंकाळी राजकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारासाठी अपेक्षित लक्षणीय गर्दी लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री 9 पर्यंत शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक वळवण्याबाबत माहिती दिली.

टाटांच्या कुलाबा निवासस्थानापासून एनसीपीएपर्यंत आणि पुढे वरळीपर्यंत दक्षिण मुंबईत वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मरीन ड्राईव्हचा रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला जाईल. अंत्ययात्रेसाठी पोलिसांनी वरळीपर्यंत ग्रीन कॉरिडॉरही तयार केला आहे. गुरुवारी सकाळपासून नरिमन पॉईंट परिसरात कडक पोलीस बंदोबस्त आणि अन्य सुरक्षा दलांसह जलद कृती दलाची वाहने तैनात करण्यात आली आहेत.

पोलीस उपायुक्त साधन पवार यांनी वरळी नाका ते रकांगी जंक्शनपर्यंत डॉ. ई. मोझेस मार्ग सर्व वाहनांसाठी तात्पुरता बंद करण्याचे आदेश दिले आहेत. वरळी नाका परिसरात जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आला आहे.

वरळी नाका परिसरात येणाऱ्या वाहनांकरीता पर्यायी मार्ग-

रखांगी जंक्शन येथून महालक्ष्मी रेल्वे स्थानक जंक्शन केशवराव खाडे मार्गाने हाजी अली जंक्शन- लाला लजपतराय मार्गाने रजनी पटेल (लोटस जंक्शन) – डॉ. अॅनी बेझंट मार्ग- गफार खान जंक्शन पुढे वरळी नाका परिसरात ईच्छीत स्थळी मार्गस्त होतील.

रखांगी जंक्शन येथून सेनापती बापट मार्ग – डावे वळण – एन. एम. जोशी मार्ग – डावे वळण- पांडूरंग बुधकर मार्ग- डावे वळण जी.एम. भोसले मार्ग – पुढे वरळी नाका परिसरात ईच्छीत स्थळी मार्गस्त होतील. (हेही वाचा: Ratan Tata Dies: रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राज्यात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर; शिंदे सरकारची घोषणा)
महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरात जाणाऱ्या वाहनांकरीता पर्यायी मार्ग-

वरळी नाका येथून डॉ. अॅनी बेझंट मार्ग- गफार खान जंक्शन पुढे रजनी पटेल (लोटस जंक्शन) – लाला लजपतराय हाजी अली जंक्शन- उजवे वळण घेवून केशवराव खाडे मार्गाने महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरात ईच्छीत स्थळी मार्गस्त होतील.

वरळी नाका येथून जी. एम. भोसले मार्ग – उजवे वळण घेवून पांडूरंग बुधकर मार्ग- उजवे वळण घेवून एन. एम. जोशी मार्ग – दिपक सिनेमा जंक्शन पुढे सेनापती बापट मार्गाने रखांगी जंक्शन येथून ईच्छीत स्थळी मार्गस्त होतील.मुंबई वाहतूक निर्बंध-
दि. १०-१०-२०२४ रोजी १३:०० वा. पासून २१:०० वा. पर्यंत, वरळी स्मशानभुमीमध्ये टाटा समुहाचे प्रमुख श्री. रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कार विधीच्या कार्याक्रमाकरिता मोठ्या संख्येने जनसुमुदाय उपस्थित राहणार आहे. या अनुषंगाने डॉ. अॅनी बेझंट मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते रतन टाटा यांना 7 ऑक्टोबरला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र, त्यांनी स्वत: आपण ठीक असून, रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये आलो असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोन दिवसांत त्यांचे निधन झाले. रतन टाटा यांचे पार्थिव वरळीतील पारशी स्मशानभूमीत नेण्यात येणार आहे. सर्व प्रथम पार्थिव प्रार्थनागृहात ठेवण्यात येणार आहे. प्रार्थना हॉलमध्ये सुमारे 200 लोक उपस्थित राहू शकतात. प्रार्थना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव विद्युत स्मशानभूमीत ठेवण्यात येईल आणि अंतिम संस्कार प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मुकेश अंबानी आणि कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह राजकारण, क्रीडा आणि व्यवसायातील अनेक व्यक्तींनी टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

पहा पोस्ट:

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *