मोठी बातमी! सरकारकडून होमगार्डच्या मानधनात दुप्पट वाढ

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

राज्य सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सरकारन कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यास सुरुवात केली आहे. राज्य मंत्रिमंडळात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सरकारने पहिल्या टप्प्यात सुमारे 2 हजार 399 कोटी रुपयांच्या वाटपाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या होमगार्ड्संदर्भातही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने होमगार्डच्या मानधानात जवळपास थेट दुप्पट वाढ केली आहे. म्हणजेच होमगार्ड्सना मिळणारा पगार आता थेट दुप्पट झाला आहे. त्यासाठी सरकारने 795 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.

सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे?
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार राज्यातील होमगार्ड्सच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज (1 ऑक्टोबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयाचा लाभ जवळपास चाळीस हजार होमगार्ड्सना होणार आहे. सध्या या होमगार्ड्सना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज 570 रुपये मिळतात. सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता हाच कर्तव्यभत्ता आता तेट 1 हजार 83 रुपये करण्यात येईल. याशिवाय उपहार भत्ता दोनशे रुपये, कवायत भत्ता 180 रुपये, खिसा भत्ता शंभर रुपये, भोजन भत्ता 250 रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने 795 कोटी रुपयांची मान्यता दिली आहे.

अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड, सरकारकडून मानधनात भरीव वाढ
राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांचीही दिवाळी गोड केली आहे. सरकारने अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्या मानधानत भरगोस वाढ केली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांच्या मानधात जवळपास 50 टक्क्यांनी वाढ केलेली आहे. या निर्णयानंतर आता अंगणवाडी मदतनीस यांना प्रतिमहिना 3000 हजार रुपये अतिरिक्त मानधन मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांना मानधनाच्या रुपात 10 हजार रुपये मिळायचे. आता या मानधनात 5000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याआधी सरकारने मानधनात 3000 रुपयांची वाढ केली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या सेविकांना इन्सेंटिव्हदेखील मिळणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *