स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या सरकारी नोकरी समाप्त होणार आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबतचा सर्वात मोठा निर्णय घेतला असून विहित मार्गाने नियुक्ती न होता थेट नियुक्ती लिहिल्यांवर गंडांतर येणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय जाहीर कला आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याची विहित कार्यपद्धतीनुसार व विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही थेट नियुक्ती झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती कराव्यात असा शासन निर्णय जाहीर झाल्याने स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे पाल्य यांच्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या सरकारी नोकरीबाबत राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची सरकारी नोकरी समाप्त होणार असून विहित मार्गाने नियुक्ती न होता थेट नियुक्ती लिहिल्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याची विहित कार्यपद्धतीनुसार व विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही थेट नियुक्ती झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती कराव्यात असा शासन निर्णय जाहीर झाल्याने स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे पाल्य यांच्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 3000 स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याच्या नोकऱ्या संपुष्टात येत आहेत.