वसई-विरारमध्ये १५ ऑगस्ट पासून इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. (national cleaning air program ) अंतर्गत एकूण ५७ बसेस आलेल्या आहेत.त्यातील १० बसेस १५ ऑगस्ट पासून धावणार आहेत. हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद सरकारमार्फत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
१५ ऑगस्टच्या निमित्ताने १० बसेस पहिल्यांदा धावणार आहेत.या बसेसच लोकार्पण देखील करण्यात आलेलं आहे. १७ बसेस नोव्हेबर पर्यंत प्राप्त होतील आणि उर्वरित बसेस ह्या मार्च महिन्यापर्यंत मिळतील अशी अपेक्षा वसई-विरार पालिकेचे आयुक्तांकडून करण्यात आलेली आहे. या बसेस ९ते १२ मीटर लांबीच्या असणार आहेत.अशा प्रकारे हवा प्रदूषण कमी करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.ह्या बसेसचा आपण नक्कीच उपयोग करून घ्या असे आवाहन आयुक्तांकडून नागरिकांना करण्यात आलेल आहे.