तरुणांसाठी मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी 71,000 तरुणांना देणार नियुक्ती पत्र

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ‘रोजगार मेळा’ (Rozgar Mela) या भरती मोहिमेअंतर्गत सोमवारी सुमारे 71,000 तरुणांना नियुक्ती पत्र (Appointment Letters) देणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) रविवारी एका निवेदनात यासंदर्भात माहिती दिली आहे. यावेळी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तरुणांना संबोधित करणार आहेत. हा रोजगार मेळावा रोजगार निर्मितीसाठी पंतप्रधानांची वचनबद्धता पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे पीएमओने म्हटले आहे. ही मोहिमेअंतर्गत तरुणांना राष्ट्र उभारणी आणि आत्म-सक्षमीकरणात सक्रिय सहभाग घेण्याची संधी देण्यात येणार आहे.

देशभरात 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन –
देशभरात 45 ठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये नियुक्ती केली जाईल. यामध्ये गृह मंत्रालय, पोस्ट विभाग, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि वित्तीय सेवा विभाग यांचा समावेश आहे.

रोजगार मेळाव्यादरम्यान लाखो तरुणांना रोजगार –
दरम्यान, 22 ऑक्टोबर 2022 रोजी रोजगार मेळावा मोहिम सुरू करण्यात आली होती. अलीकडेच, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारने सांगितले होते की, या भरती मोहिमेद्वारे आतापर्यंत लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
दरम्यान, पहिल्या मेळाव्यादरम्यान 75,000 हून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली होती. केंद्रीय मंत्रालये आणि विभाग UPSC, SSC, आणि रेल्वे भर्ती बोर्ड यांसारख्या भर्ती एजन्सीद्वारे तरुणांची भरती करतात.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *