मोठी बातमी ! मुंबई लोकल बॉम्बस्फोटातील ११ आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवले

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

२००६ मधील मुंबई लोकल बॉम्बस्फोटातील ११ आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवले. नागपूर आणि अमरावती कारागृहांतील काही आरोपींची सुटका झाली आहे. नागपूरच्या तुरुंगातील एका आरोपीचा मृत्यू झाला. एका आरोपीवर वेगळा गुन्हा दाखल असल्याने तो अजून तुरुंगात आहे.

११ जुलै २००६ रोजी मुंबई लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील ११ आरोपींना उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली. यापैकी नागपूर आणि अमरावती कारागृहात प्रत्येकी ४ आरोपी होते. नागपूरच्या कारागृहातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. दोन आरोपींची सुटका झाली, तर एक आरोपी अजूनही तुरुंगात आहे. एका वेगळ्या गुन्ह्यात तो अडकल्यामुळे त्याची सुटका होऊ शकलेली नाही. २००६ च्या या बॉम्बस्फोटात २०९ लोकांचा जीव गेला होता, तर ८०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.

२०१५ पासून या बॉम्बस्फोटातील चार आरोपी नागपूरच्या कारागृहात होते. यापैकी दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, तर एकाला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी आणि नावेद हुसैन खान रशीद हुसेन खान या दोघांना फाशीची शिक्षा झाली होती. शेख मोहम्मद अली अलम शेख याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तर, कमाल अन्सारी नावाच्या एका आरोपीचा करोनामुळे मृत्यू झाला. सिद्दीकी आणि अलम शेख या दोघांची सोमवारी सुटका झाली.

निर्दोष सुटका, हायकोर्टाचा निकाल
आणखी एक आरोपी, अलम शेख अजूनही तुरुंगात आहे. याबद्दल तुरुंग अधीक्षक वैभव आगे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “शेखने नागपूर कारागृहात एका कैद्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा खटला अजून चालू आहे आणि त्याला जामीन मिळालेला नाही. त्यामुळे त्याची सुटका झालेली नाही.”

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटका झालेल्या पुण्यातील सुहैल शेखची पहिली प्रतिक्रिया!
२००६ साली मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. हे बॉम्बस्फोट इतके भयंकर होते की, त्यात शेकडो लोकांचे प्राण गेले. अनेक लोक गंभीर जखमी झाले. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती. या बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएने केला होता.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *