लेखणी बुलंद टीम:
मुंबई ट्राफिक पोलिसांकडून कोस्टल रोड 24 तास यंदाच्या गणेशोत्सवामध्ये 24 तास खुला ठेवला जाणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. आज 7 सप्टेंबर गणेश चतुर्थी ते 17 सप्टेंबर अनंत चतुर्दशी दरम्यान हा कोस्टल रोड (Coastal Road) खुला राहणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावरील गर्दी पाहता कोस्टल रोड खुला ठेवण्याचा निर्णय झाला आहे. 18 सप्टेंबर पर्यंत कोस्टल रोड खुला राहील. तसेच मुंबई मध्ये इतर भागातही वाहतूकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
सध्या कोस्टल रोड हा वांद्रा वरळी सी लिंक ला जोडण्यासाठी बंद ठेवण्यात आला होता. तर काम पूर्ण करण्यासाठी नॉर्थबाऊंड कॅरेजवे बंद ठेवला जातो. पण आता गणेशोत्सवाची गर्दी पाहता कोस्टल रोड खुला ठेवण्यात आला आहे.कोस्टल रोडचे सुमारे 95% काम पूर्ण झाले आहे. आता गणेशोत्सवामध्ये 24 तास कोस्टल रोड पूर्णपणे खुला ठेवण्यामध्ये अडचण नसल्याचं प्रशासकीय अधिकार्यांणनी म्हटलं आहे. पुढील आठवड्यापर्यंत कोस्टल रोड आणि बीडब्ल्यूएसएलचा दक्षिणेकडील कॅरेजवे उघडण्याची बीएमसीचा मानस आहे. मरीन ड्राइव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून BWSL च्या वरळीच्या टोकापर्यंत 10.58-किमी कोस्टल रोड पसरलेला आहे.
पहा पोस्ट:
In view of Ganesh Chaturthi celebrations, the following traffic arrangements have been made from 6th to 18th September
गणेश चतुर्थी उत्सवाच्या अनुषंगाने वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी ६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत दक्षिण मुंबईत खालील वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. pic.twitter.com/Q1lCneiGCg
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 7, 2024