चंद्रहार पाटील यांनी अखेर उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडीयामध्ये पोस्ट शेअर करत हा निर्णय जाहीर केला आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये सांगली च्या जागेवरून महाविकास आघाडी मध्ये तणाव निर्माण झाला होता. शिवसेना उबाठाने हट्टाने सांगलीची जागा स्वतःकडे ठेवत चंद्रहार पाटील यांच्या बाजूने उभं राहण्याची भूमिका निवडली पण आता चंद्रहार पाटील यांनी प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय अनेक गोष्टी होऊ शकत नसल्याने महायुती सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेत असल्याचं म्हटलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे, असं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आता त्यांनी थेट निर्णयच जाहीर केला आहे.