मोठी बातमी समोर येत आहे, कृषमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला, त्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता माणिकराव कोकाटे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ते काही महत्त्वाची घोषणा करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.