मागील काही वर्षांपासून भारतापेक्षा चीन काही गोष्टींमध्ये पुढे गेलाय. भारताला काही गोष्टींसाठी चीनकडे बघावे लागते. पण चीनकडून कधी कधी भारताला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. रेअर अर्थ मेटल्ससाठी भारताला चीनवरच अवलंबून राहवे लागते. यापुढे भारताला चीनकडे बघण्याची अजिबातच गरज नाहीये. भारताला रेअर अर्थ मेटल्सचा मोठा खजिना मिळाला आहे. यामुळे आता चीनवर अवलंबून राहण्याची अजिबातच गरज नाहीये.
अरूणाचल प्रदेशामधील डोंगरांमधून दोन नद्या वाहतात. यापैकी एका नदीचे नाव पापुम आणि दुसऱ्या नदीचे नाव पारे आहे. आता या नद्या संपूर्ण देशात चर्चेत आल्या आहेत. मुळात म्हणजे पापुम आणि पारे नद्यांमध्ये रेअर अर्थ मेटल्सचा मोठा खजिना सापडला आहे. रिपोर्टनुसार खनिज मंत्रालयाने एक पुस्तक प्रकाशित केले असून यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की, या भागात मोठ्या प्रमाणात नियोडिमियम सापडले आहे. नियोडिमियम हे महत्वाचा घटक असून इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करते.
रेअर अर्थ मेटल्सचा उपयोग मॅग्रेट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो आणि इलेक्ट्रिक वाहनांना मदत होते. या दोन्ही नद्यांमधून जर रेअर अर्थ मेटल्सचा खजिना काढण्यात आला तर पुणे, चेन्नई आणि दिल्ली गुडगाव शहरातील इलेक्ट्रिक व्हिकल आणि ऑटोमोबाईल उद्योगाला एक मोठा आधार मिळेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारताला चीनवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. याचा फायदा थेट भारताला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.