भारतीय नौदलाने श्रीलंकेच्या नौदलासोबत संयुक्त कारवाई करत अरबी समुद्रातून 500 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. तसेच दोन बोटीतून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज क्रिस्टल मेथ होते.
मिळालेल्या माहितीनुसार जप्त केलेल्या दोन्ही बोटी, त्यातील लोक आणि ड्रग्ज श्रीलंका सरकारकडे सुपूर्द करण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.तसेच अलीकडच्या काळात देशात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.